पाणी हे जीवन मानले गेलेले आहे. पण हे कधी, जेव्हा ते प्रमाणबद्ध आपल्या शरीरामध्ये असते तेव्हा पाण्याचे प्रमाण जास्त झाले शरीरात किंवा कमी झाले तरी सुद्धा त्याचे विचित्र परिणाम आपल्याला दिसून यायला लागतात. तसे तर आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने बनलेले आहे तर तुम्ही विचार करू शकता पाणी हे किती महत्त्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये.
आज-काल लोक सर्रास सकाळी उठून एक तांब्या किंवा एक लिटर पाणी सर्रास पिताना दिसतात हे खरोखर चांगले आहे का वाईट कधी विचार केलाय?
तुम्हाला कदाचित माहिती नसेल की जसे अन्न आपल्या शरीरामध्ये पचते तसेच पाणीही पचते त्याला सुद्धा शरीराला पचवण्यास शक्ती लागत असते. आयुर्वेदानुसार उषःपान म्हणजे सकाळी उठून पाणी पिणे सांगितलेले आहे पण ते कधी तर ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळचे चार ते साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही सकाळी उठलेले असाल तर तुम्ही अर्धा कप किंवा एक कप चे उषःपान करू शकता. आता तुम्हाला कळाले असेल की आपण किती गोष्टी आणि किती वेळा पासून चुकीचे करत होतो. याचे कारणही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
जसे वातावरणामध्ये बदल होतात आणि ऋतू बदलतो तसेच दिवसभरामध्ये सुद्धा आपल्या शरीराचे ऋतू हे बदलत असतात. सकाळचा जो कालावधी आहे त्या दरम्यान मध्येच पोट साफ होण्याचे वेग का येतात? किंवा संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होत असतो त्यावेळी सुद्धा हा वेग आपल्याला जाणवतो का जाणवतो कारण त्या दरम्यान मध्ये आपल्या शरीरामध्ये वायू हा प्रभूत प्रमाणामध्ये दिसून येत असतो आणि त्याचे कार्यही त्या वेळेतच जास्त स्वरूपात दिसून येतात म्हणून. यावरून तुम्हाला एक अंदाज आलेला असेल की कसे आपल्या शरीरामध्ये काळ हे बदलत राहतात जेव्हा तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठता त्यावेळी जे दोष शरीरामध्ये जास्त प्रमाणात असतात ते पाणी सकाळी उठून बसवण्याचे काम करते व शरीरामध्ये लागवता आणते पण जर तुम्ही सकाळी सहाच्या नंतर उठत असताल आणि पाणी घेत असाल तर तुमच्या शरीराला त्याचे हानिकारक परिणाम सोसावे लागतील जसे शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण वाढणे किंवा मायग्रेनचा त्रास होणे किंवा व्यवस्थित अन्न न पचणे व पोटामध्ये जडत्व भासने. या सर्व गोष्टी घेऊन जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळी आम्हाला सर्वात आधी त्याचे सकाळी चे उषःपान बंद करावे लागते व आपोआप नंतर सगळे व्यवस्थित होऊ लागते.
पाणी पिण्याचा काळ सर्वात चांगला कोणता?
जेव्हा तहान लागते तेव्हा खाली बसून व्यवस्थित रित्या हळुवारपणे एक एक घोट पाणी पिणे जेवढी तहान असेल तेवढेच पाणी पिणे.
काही लोकांची सवय असते की पाणी एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये गेलेच पाहिजे शरीरामध्ये किंवा एकदा पाणी प्यायला लागले तर एक ग्लास दोन ग्लास किमान पाणी पितात.
जसे अन्नाला पोटातील पाचक रस पचवतात तसेच पाण्याला तोंडातील लाळ जे क्षार आणि बनलेली असते ते पचवत असते तर जेव्हा तुम्ही पाणी पिता त्यावेळी तोंडातील लाळ हे एका एका घोटा सोबत आत मध्ये गेली पाहिजे म्हणजेच ते पाणी व्यवस्थित रित्या पचेल.
पाणी पिण्याची सर्वात चांगली पद्धत-
- पाणी हे उकळून गार केलेले हवे.
- पाणी उकळताना त्यामध्ये सोन्याची छोटीशी बळी घातलेली असेल तर त्याने शरीराची व्याधीक्षमता वाढते.
- पाणी पिताना कधीही तोंडाला ग्लास लावूनच पाणी प्यावे वरतून नाही.
- उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी सर्वात उत्तम ना की फ्रिज मधले.
- पाणी जर नळातून किंवा फिल्टर मधून तुम्ही वापरत असाल तर त्याचा साठा पिंपळात किंवा तांब्यामध्ये करून नंतरच त्याचे ग्रहण करावे.
About Dr. Nyanisha Desai- Director Of Pradnya Ayurveda
डॉ. न्यानिशा देसाई या प्रज्ञा आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक आहेत. 2009 मध्ये, तिने तिचे बीएएमएस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगाव, कोल्हापूर येथे पूर्ण केले. ती 2011 पासून चिंचवड, पुणे येथील आयुश्री आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म केंद्रात प्रॅक्टिस करत आहे. त्यानंतर तिने 2018 मध्ये इंद्रायणी नगर भोसरी येथील प्रज्ञा आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली, रुग्णांवर शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने सर्वांगीण औषधोपचार करण्याच्या उद्देशाने. तिला वंध्यत्व आणि एनोरेक्टल थेरपीचा विशेष अनुभव आहे.