Panchakarma treatment in pcmc

आयुर्वेदिक उपचार पद्धती म्हटलं की पंचकर्म उपचार( Panchakarma Treatment) हे आलेच, कोणा कोणाला आयुर्वेद म्हणजे पंचकर्म असेच माहिती आहे. पण नेमके पंचकर्म म्हणजे काय? माहिती आहे का? काही जणांना ही एक खर्चिक उपचार म्हणूनच माहिती आहे. पंचकर्म जाणून घ्यायचा असेल तर त्याचे कार्य कसे घडते व कशावर घडते हे तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
खरंतर पंचकर्म करून घेतले तर जुनाट आजार सुद्धा बरे होतात पण ते शास्त्रोक्त पद्धतीने केले गेले पाहिजे व वैद्यांचा सल्ला डावलता सगळे पथ्य व्यवस्थित पाळले गेले पाहिजे. कधी कधी आपण पाहतो की एक आजार झाला की त्याची औषध चालू होऊन जातात व थोड्या वर्षानंतर त्याच्या साथीने दुसरे पण आजार आपल्याला दिसू लागतात. उदाहरण रित्या थायरॉईड किंवा डायबिटीस झालेला असेल तर दोन ते तीन वर्षांमध्ये आपल्याला बीपीचा त्रास हृदयाचे विकार त्वचाचे तक्रारी हे चालू व्हायला लागतात.
याचे कारण कधी शोधून पाहिले आहे का? पण हेच जर तुम्हाला पहिला कोणता आजार झालेला असेल आणि त्याची आयुर्वेदिक उपचार करत असल्यास तुम्हाला पुढचे विकार संभवत नाही किंवा ज्या तीव्रतेने ते व्हायला हवे त्याची तीव्रता नक्कीच कमी असते. कोणताही विकार आपल्या शरीरामध्ये होताना त्याचे मूळ बनायला हे नक्कीच थोडा कालावधी जातच असतो जेवढा मोठा आजार तेवढा मोठा कालावधी बनण्यास शरीराला लागतो. म्हणजे एखाद्याला डायबेटीस होणार असेल तर त्याचे कार्मुकत्व हे दीड दोन वर्षा पाठीच चालू झालेले असते शरीरात. तुम्हाला आज शरीरामध्ये काही कारण घडले आणि उद्या आजार उत्पन्न झाला असे कधीच होत नाही. साधे वायरल इन्फेक्शन बसायचे असेल तरीसुद्धा शरीर कमकुवत झालेले असेल म्हणजेच व्याधी प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असेल कोणत्याही कारणाने तरच त्याचा परिणाम म्हणून वायरल इन्फेक्शन बसते. शरीर त्या कालावधीमध्ये स्वतः लढण्याचा प्रयत्न करते व त्याच्या छोट्या छोट्या अंशांमध्ये दोष सामावून घेते. जेव्हा शरीरातून कोणत्याही प्रकारची औषधे आपण घेतो तेव्हा आपल्या अन्ननलिकेमध्ये किंवा वर साठलेले जे दोष आहे त्यावरती औषधांचे काम पहिले होते व हे अंशा अंशामध्ये जे साठलेले दोष असतात त्यावर काम होत नाही किंवा खूप उशिरा घडते. आणि इथे पंचकर्माचे महत्त्व दिसून येते किंवा कार्मुकत्व दिसते.
एकंदरीत विचार केल्यास पंचकर्म हे शरीराची शुद्धी करणारे, शरीराच्या अंशा अंशा मधून दोष बाहेर काढणारे, शरीराला पुन्हा नवीन स्वरूप देणारे, जेणेकरून प्रतिकार शक्ती सुद्धा वाढविणारे, एकंदरीत शरीराची काया पलट करणारे अशी उपचार पद्धती आहे.

पंचकर्माचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे ( Panchakarma Type):-

१. बस्ती
२. वमन
३. विरेचन
४. नस्य
५. रक्त मोक्षण

या सर्व कर्मांमध्ये प्राथमिक एक पूर्व कर्म असते, प्रधान कर्म म्हणजे मुख्य कर्म असते व शेवटी पश्चात कर्म हे समाविष्ट असतात. कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनला नेणाऱ्या पेशंटची जशी प्री प्रोसिजर करावी लागते तसेच पंचकर्मामध्ये काही प्री प्रोसिजरला पूर्व कर्म म्हटले जाते उदाहरण स्नेहन स्वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम, काहीजण यालाच पंचकर्म म्हणतात ती सरासरी चुकीची बाब आहे, ही प्रक्रिया फक्त शरीराचे दोष सुटण्यासाठी केली जाते त्याचा उपचाराशी काहीही घेणं देणं नसतं जेणेकरून जे प्रधान कर्म म्हणजे मुख्य कर्म पंचकर्म होणार आहे त्याचा फायदा शरीराला व्यवस्थित होण्यासाठी. पश्चात कर्म म्हणजे पोस्ट ऑप प्रोसिजर जसे असते तसाच भाग पंचकर्मानंतर सुद्धा केला जातो जसे पेशंटची काळजी घेणे पंचकर्मानंतर शरीर नाजूक होऊन जाते त्याची आहाराची पद्धती म्हणजेच पश्चात कर्म.

१.बस्ती-

बस्ती म्हणजे मेडिकेटेड इनेमा, याचे साधारण दीडशे ते दोनशे प्रकार आहेत जो पाहिजे जसा पाहिजे तसे बदल औषधांमध्ये करून बस्ती दिली जाते. बस्ती ही प्रक्रिया आतड्यांमधून जास्तीत जास्त शोषून घेतली जाते म्हणून या मार्गे दिली जाते आणि याचा फायदा तुम्हाला लगेच दिसून येतो. बस्ती हे जास्त करून वात विकारांवरती उपयोगी पडते जसे पॅरलिसीस, बेल्स पाल्सी, कमरेचे आजार सांध्यांचे आजार,
असा कोणताच आजार नाही जो बस्तीद्वारे बरा होत नाही. आणि ही सगळ्यात सोपी प्रक्रिया सुद्धा मानली जाते.

२. वमन-

या पंचकर्मामध्ये पहिले पाच दिवस औषधी तूप दिले जाते व नंतर उलटी द्वारे सर्व दोष बाहेर काढले जातात, नाभीच्या वर झालेल्या विकारांमध्ये याचा सर्वात जास्त फायदा दिसून येतो. आम्लपित्त त्वचा विकारांवरती वमनाशिवाय पर्याय नाही.

3. विरेचन-

यामध्ये सुद्धा पहिले पाच दिवस औषधी तूप दिले जाते मग नंतर जुलाबा वाटे दोष बाहेर काढली जातात. उष्णतेचा त्रास त्वचा विकास दमा यावर सर्वात उत्तम प्रक्रिया.

४. नस्य-

नस्य म्हणजे नाकामध्ये औषध सोडणे, हे पंचकर्म सुद्धा खूप सोपे आणि सोयीस्कर मानले जाते. स्पोंडीलोसिस, सायनस मायग्रेन किंवा मानेच्या वरच्या भागां मधील विकारांमध्ये याचा उपयोग सर्वश्रेष्ठ आहे.

५. रक्त मोक्षण –

रक्त मोक्षांचे मुख्य प्रकार म्हणजे जलवकाचरण व शिरावेध. वाताच्या विकारांमध्ये व त्वचा विकारांमध्ये याचा उपयोग सहसा केला जातो.
पंचकर्माचे उपाय हे शरीरामधून फक्त विकार नाहीसे करण्यासाठी नव्हे तर वार्षिक शरीराची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा केले जाते. ज्या लोकांना विकार नाही आहे त्यांनी सुद्धा पंचकर्म करून घेतल्याने त्यांचे आयुष्याचे वर्धन होते. तसे आयुर्वेदामध्ये म्हटलेलेच आहे पहिले स्वास्थ्याचे रक्षण करावे नंतर विकाराचे निरसन करावे.

तुम्हाला पिंपरी-चिंचवडमध्ये पंचकर्म उपचार(Panchakarama Treatment in Pimpari- Chinchwad) हवे असल्यास, तुम्ही प्रज्ञाआयुर्वेदिक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. न्यानिशा देसाई यांचा सल्ला घ्यावा.

Dr. Nyanisha Desai- Director Of Pradnya Ayurveda

डॉ. न्यानिशा देसाई या प्रज्ञा आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक आहेत. 2009 मध्ये, तिने तिचे बीएएमएस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगाव, कोल्हापूर येथे पूर्ण केले. ती 2011 पासून चिंचवड, पुणे येथील आयुश्री आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म केंद्रात प्रॅक्टिस करत आहे. त्यानंतर तिने 2018 मध्ये इंद्रायणी नगर भोसरी येथील प्रज्ञा आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली, रुग्णांवर शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने सर्वांगीण औषधोपचार करण्याच्या उद्देशाने. तिला वंध्यत्व आणि एनोरेक्टल थेरपीचा विशेष अनुभव आहे.