Hai fall ayurvedic treatment in pcmc

 जेव्हा केसांमध्ये भांग पाडल्या जातो आणि त्या भागामध्ये केस खूप विरळ दिसत असतील तर समजावे की केस केस गळती (Hair Fall) उपाय शोधणे गरजेचे आहेत. आज-काल अनेकांना ही समस्या असते. त्याची कारणे भरपूर असू शकतात वाढते वय मानसिक ताण तणाव हार्मोन्स असंतुलन पोषक तत्वांची कमतरता हवेतील प्रदूषण इतर शारीरिक आजार हे केस गळतीसाठी प्रामुख्याने कारणीभूत असतात.

कधीकधी केस गळतीची परिणीती बहुतेक वेळा टक्कल पडण्यामध्ये होते ज्याला आपण अँड्रोजेनिक एलोपेशिया (androgenic alopecia)असेही म्हणतात. केस गळण्याचे उपाय बहुतेक करून सर्वजण ऑनलाइन शोधत असतात आणि काही ना काही घरातल्या घरात उपायही करत असतात पण तरीसुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर लवकरात लवकर त्याची चिकित्सा करून घेणे गरजेचे आहे. त्याचे कारण शारीरिक ही असू शकतात.

केस गळती आयुर्वेदिक उपचार- ( Hair Fall Ayurvedic Treatment in Marathi)

जेव्हा केव्हा केस गळती आयुर्वेदिक उपचार(hair fall ayurvedic treatment) होतात त्यावेळी त्याचे मूळ कारण शोधल्यानंतरच त्याची चिकित्सा होत असते केस गळण्यावरती मुख्य कारण शोधून काढले पाहिजे आणि त्यावर उपाय केले पाहिजेत त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसत नाहीत किंवा थोडे दिवस दिसतात आणि नंतर परत गळती चालू.  त्याचे कारण थायरॉईड (Thyroid) असू शकते किंवा विटामिन बी 12 ची डिफिशन्सी जी आजकाल खूप जणांमध्ये दिसून येते. आयुर्वेदिक उपचार करताना औषधी उपचार व पंचकर्माचे उपचार असे दोन पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. औषधोपचारांमध्ये आपल्या हाडांना मजबुती मिळेल अशी औषध केसांवरती खूप छान लागू पडतात. केस हे हाडांचा मल असतात म्हणून जितके मजबूत हाड तितकेच मजबूत केस.

विविध प्रकारचे लेप सुद्धा बाह्य उपचारांमध्ये केस गळतीसाठी वापरली जातात जेणेकरून केसांचे मूळ बळकट होऊन स्काल्पची त्वचा ही निरोगी राहते.

शिरोधरा(Shirodhara) म्हणजेच कपाळावरती तेलाची धार सोडणे हे पंचकर्म केसांसाठी खूप उपयोगी ठरते स्ट्रेस, बीपी चा त्रास, थायरॉईड या कारणामुळे जर केस गळत असतील तर यापेक्षा चांगला उपाय नाही. आपल्याला ज्या प्रकारचे समस्या असतील त्या प्रकारचे तेल या उपचारांमध्ये वापरून शिरोधरा केली जाते.

 1. शिरो पिचू- या उपचारांमध्ये छोटासा कॉटन डोक्याच्या वरच्या भागांमध्ये केसांवर तेलामध्ये भिजवून ठेवला जातो येणे सुद्धा फायदा दिसतो केसांचे मूळ कमजोर असतील तर याने फायदा होताना दिसतो.

 2. बस्ती- खूपदा आपल्याला दिसून येते की हायपर ऍसिडिटी मुळे केव्हा पोटाच्या तक्रारीमुळे केस गळती असते अशा आजारांवरती बस्ती उपचाराने केस गळती वरती चांगले उपचार होऊ शकतात.

3. तक्रधारा- या प्रकारामध्ये ताकामध्ये काही औषधांचे संस्कार करून कपाळावरती धार सोडली जाते ओबेसिटी किंवा असल्या कारणामुळे जर केस गळती असेल तर यापेक्षा चांगला उपाय नाही.

4) रक्त मोक्षन– केस गळत असतील तर किंवा एखाद्या भागामध्येच केस गळत असतील सारखीचाई पडत असेल डँड्रफ वारंवार होत असेल केसांची स्निग्धता जात असेल किंवा जास्त वृक्ष झालेले असतील तर रक्त मोक्षण हा उपचार केला जातो.

खरे तर केस गळण्यावरती जे काही कारण शरीरामध्ये होत असेल त्यावर उपचार करून घेतले तर हमखास रिझल्ट मिळतात पण योग्य प्रकारे आणि विना केमिकल ट्रीटमेंट करणे गरजेचे.

जर तुम्हाला पीसीएमसीमध्ये केसगळतीचे आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर तुम्ही  प्रज्ञा आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ.न्यानिशा देसाई यांचा सल्ला घ्यावा.

About Dr. Nyanisha Desai- Director Of Pradnya Ayurveda

डॉ. न्यानिशा देसाई या प्रज्ञा आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक आहेत. 2009 मध्ये, तिने तिचे बीएएमएस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगाव, कोल्हापूर येथे पूर्ण केले. ती 2011 पासून चिंचवड, पुणे येथील आयुश्री आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म केंद्रात प्रॅक्टिस करत आहे. त्यानंतर तिने 2018 मध्ये इंद्रायणी नगर भोसरी येथील प्रज्ञा आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली, रुग्णांवर शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने सर्वांगीण औषधोपचार करण्याच्या उद्देशाने. तिला वंध्यत्व आणि एनोरेक्टल थेरपीचा विशेष अनुभव आहे.