आयुर्वेदाने कंट्रोल करा थायरॉईड (Thyroid) समस्या | Pradnya Ayurveda


_Ayurvedic treatment for thyroid in PCMC

थायरॉईड (Thyroid) हा एक अशी शरीरामधली ग्रंथी आहे जी शरीरातले सर्वच चय अपचयाची क्रिया कंट्रोल करते. जेव्हा शरीरामध्ये अन्न पोटात जाते त्या स्थिती पासून ते शरीरामध्ये मल बाहेर काढेपर्यंत चय अपचयाच्या क्रिया शरीरात होत राहतात. जसे अन्नपचवल्या जाणे त्याच्यातून आहार रसाची निर्मिती होणे त्यामधून रक्त धातूची निर्मिती होणे शरीराच्या मांस धातूला (muscles) पोषण नंतर मेदधातू ( fats) मग अस्थी धातू (bones), मज्जा धातू(bone marrow) आणि शेवटी शुक्रधातू . म्हणजेच जवळपास सर्व शरीराच्या क्रिया थायरॉईड (Thyroid)  ग्रंथी सांभाळत असते कोणत्या धातूला किती पोषण मिळते ते किती पुष्ट होतात त्याच्या मधील मलाचे मिश्रण व्यवस्थित होते की नाही त्याच्यामध्ये कमतरता हे सर्वच थायरॉईड (Thyroid) ग्रंथीवर अवलंबून असते. या कार्यावरून तुम्हाला सर्वांना समजलेच असेल की थायरॉईड ग्रंथी ही किती महत्त्वाची आहे. आयुर्वेदाप्रमाणे थायरॉईड हे पित्तदोषाशी निगडित आहे. म्हणजे पाचनक्रियाशी याचा निकटचा संबंध आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे किंवा आपण दैनंदिन आयुष्यामध्ये हे सर्रास बघतोच थायरॉईड हा आजार जास्तीत जास्त स्त्रियांना होतो पाचन सोडले तर अजून एक त्याच्याशी निगडित असलेले कारण म्हणजे stress मानसिक ताण तणाव.

एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये तसे पाहिले गेले तर शारीरिक बदल तर जास्तीत जास्त होतातच पण मानसिक ताण तणाव सुद्धा तिला खूप सोसावा लागतो हेच मोठे कारण ठरलेले आहे की स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त थायरॉईडच्या तक्रारी दिसण्यात.

आजकालचे खान पान आणि मानसिक ताण तणाव इतका वाढलेला आहे की हा आजार पुरुषांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये दिसून येत आहे सध्या. थायरॉइडचा एक प्रकार म्हणजे हायपोथायरॉइडिजम हा खूप जणांमध्ये दिसून येतो यामध्ये दुसरे प्रकार सुद्धा आढळून येतात पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

हायपो थायरॉईड झाल्यानंतर काय काय बदल तुमच्या शरीरामध्ये दिसतात?

  1.         1) शरीरावरती सूज असल्यासारखे किंवा फुगलेले दिसते.
  2.         2) कमी जेवण असताना सुद्धा वजन वाढतच राहते.
  3.         3) पायावरती सूज दिसून येते.
  4.         4) केस गळतात व रूक्ष होऊन मधून तुटू लागतात.
  5.         5) थकल्यासारखे वाटते.
  6.         6) चेहरा डोळ्यांवरती एक प्रकारची सूज दिसून येते.
  7.         7) शरीराला थोडी फार थंडी सुद्धा सोसवत नाही.
  8.         8) पाचनाच्या तक्रारी होतात.
  9.         9) पोट व्यवस्थित साफ नसते.
  10.        10) मासिक पाळीच्या तक्रारी वाढतात.

आयुर्वेदामध्ये थायरॉईडचे चांगले निवारण होऊ शकते-:-

आयुर्वेदामध्ये थायरॉईडला मंदाग्नी सारखे समजले जाते. म्हणजेच जाठर अग्नी वरती काम केले जाते. यावर कार्य करणारी चिकित्सा थायरॉईड वरती उत्तम रिझल्ट देते.

१. औषधी उपचार-

कधी कधी थायरॉईड हा आजार ची थोडीफार लक्षणे पहिले आपल्याला दिसत असतील तर फक्त औषधी उपचाराने सुद्धा हा आजार आपण पालटवू शकतो. थोडे जास्त दिवस जरी औषधी घ्यावी लागली तरीसुद्धा आयुष्यभर गोळी खाण्याचे काम लागणार नाही. वैद्यांच्या सल्ल्याने हे उपचार चालू ठेवणे.

२. पंचकर्मचिकित्सा-

थायरॉईड(Thyroid) झाल्याचे जे मूळ कारण आहे ते शोधून काढून त्यावर पंचकर्म(Panchakarma) करून घेतल्याने आजार पुढे तरी सरकत नाही व त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स तिथेच थांबून जातात. वैद्याच्या सल्ल्यानुसार वमन विरेचन बस्ती हे पंचकर्म सातत्याने केले गेले पाहिजे जेणेकरून शरीरामध्ये साठलेले दोष वेळच्यावेळी बाहेर निघून जातात.

शिरोधारा-

स्ट्रेस साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे शिरोधारा माथ्यावर सोडली जाणारी धारा म्हणजेच शिरोधारा या धारेमुळे मेंदूमधील काही ग्रंथींवरती चांगले कार्य दिसून येते व स्ट्रेस लेव्हल कमी होतो जेणेकरून आपल्या थायरॉईड ग्रंथीवर सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतात.

आहारामधील बदल-

जड पदार्थ जसे बेकरी फूड बाहेरचे तळलेले मसालेदार जेवण हे जास्तीत जास्त टाळले गेले पाहिजेत जेणेकरून जे काम जाठरणीवर होत आहे त्याचे कार्य व्यवस्थित दिसून येते शरीराला हलका आहार दिल्यानंतर शरीराचे जे कार्य आहे ते दुप्पट रित्या दिसून येते आणि विकार लवकर बरा होण्यास मदत होते.

व्यायाम-

दैनंदिन आयुष्यामध्ये व्यायाम असल्याने आपले सर्वच अग्नी ह्या चांगल्या रित्या काम करतात ज्या ठरवणे किंवा धात्वाग्नी यांना एक प्रकारची चालना मिळते. जेव्हा थायरॉईड वरती चिकित्सा चालू असते त्यावेळी सर्वात जास्त कार्य हे जाठरगणी आणि धातवागणी सुधारण्यासाठी होत असते त्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये व्यायाम थायरॉईड दुरुस्त करण्यासाठी हा ठेवलाच पाहिजे.

About Dr. Nyanisha Desai:-

Dr. Nyanisha Desai is the director of the Pradnya Ayurvedic Multi-Specialty Hospital. In 2009, she completed her BAMS at Ayurvedic Medical College, Peth Vadgaon, Kolhapur. She has been practicing at Aayushree Ayurvedic Clinic and Panchakarma Center in Chinchwad, Pune since 2011. Then she founded Pradnya Ayurveda Multispecialty HospitalIndrayani Nagar Bhosari, in 2018 with an aim to treat patients in a pure and natural way of holistic medicine. She has specialized experience in infertility and anorectal therapy.